शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

खंबाळे येथे पथकातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:54 PM

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणुजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवारी (दि.३०) पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळे परिसरात पाहणी करून आढावा घेतला. पथकाने यासंदर्भात आवश्यक माहिती जमा केली आहे. पुणे येथे जाऊन निश्चित स्वरूपाची कारणे शोधली जाणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.

ठळक मुद्देखंबाळे गाव व परिसरातील एकापाठोपाठ गायी दगावत गेल्या.

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणुजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवारी (दि.३०) पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळे परिसरात पाहणी करून आढावा घेतला. पथकाने यासंदर्भात आवश्यक माहिती जमा केली आहे. पुणे येथे जाऊन निश्चित स्वरूपाची कारणे शोधली जाणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारपासून (दि. २३) अज्ञात आजाराची लागण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गायींना झाली. या आजारामुळे आजपर्यंत खंबाळे येथील दहा ते पंधरा गायी दगावल्या आहेत, तर सुरेगावातही एक गाय दगावली. कोकणात आढळणारा बोटूलिझम (हळवा) हा आजार असण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली. या आजाराची लागण झाल्यानंतर खंबाळे गाव व परिसरातील एकापाठोपाठ गायी दगावत गेल्याने तालुका तसेच जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या पथकाने याचा आढावा घेतला.मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. दौंड (पुण)े येथे महाराष्टÑासह सात राज्यांतील रोग अन्वेषण विभागाला याची माहिती दिल्यानंतर तेथील पथकाने खंबाळे येथे येऊन पाहणी केली. बोटूलिझम हा प्रामुख्याने गायी, म्हशींना होणारा जीवघेणा विषाणुजन्य रोग असून, मृत कुजलेल्या जनावरांमध्ये या रोगाची झपाट्याने वाढ होते. कुजलेला, सडलेला पाला पाचोळा, चारा, डबक्यातील दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यातील जीवाणूंनी तयार केलेले विष पोटात गेल्याने जनावरांना हा रोग होतो. जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे, तोंडातून लाळ येणे, कंबरेचा मागील भाग लुळा होणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे असून, श्वासोच्छ्वासाला अडचण निर्माण होऊन जनावर दगावते.