शेतक-यांच्या संजीवनी गट, नाशिक कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बी. बी. एफ. तंत्रज्ञानद्वारे सोयाबीन वानाच्या पेरणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. मोह येथील शेतकरी अरु ण भिसे यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी ए. एच. गागरे, कृषी विज्ञान केंद्र नाशिकचे डॉ. प्रकाश कदम, डॉ. राजाराम पाटील यांनी शेतकऱ्यांना पेरणी पूर्व मशागत, ऊगवण,फवारणी,काढणी-मळणी व विक्र ी आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उगवण झालेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन शेतकºयांना अनेक उपाययोजना सांगितल्या.यावेळी मंडळ कृषि अधिकारी महेश वेठेकर, मोहचे सरपंच सोमनाथ बोडके, संजीवनी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष सुनील भिसे , रामदास भिसे, किरण बोराडे, भारत बोडके, पांडुरंग भिसे, भगवान झाडे, संदीप भिसे, गोरख भिसे आदी उपस्थित होते.
कृषी संजीवनी गटातर्फे कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 1:06 PM