नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाचे उशिराने आगमण झाल्यामुळे पिकांची काळजी घेण्यासाठी भरवीर बुद्रुक येथे कृषी विभागाच्या वतीने आत्मा योजनेअंतर्गत कीटकनाशक फवारणी तसेच कीड नियंत्रण व्यवस्थापन याविषयी दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुका अधिकारी शीतलकुमार तवर यांच्यासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात कौशल्य आधारित काम करणाºया शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.भरवीर बुद्रुक येथील शेतकरी संजय झनकर यांच्या शेतीतील मका पिकावर फवारणी करत कीटकनाशके फवारणी करण्याचे व सरंक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. शिबिरात भरवीर बुद्रुक, भंडारदरावाडी येथील ५० ते ६० शेतकरी सहभागी झाले होते. शेतकºयांनी मका पिकावरील कीड ओळख व त्यावरील कीटकनाशक फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजनांसाठी वापरावयाचे कोट, हातमौजे, चश्मा आदीं साहित्य (किट) कसे वापरावे व फवारणी करताना काळजी कशी घ्यावी, याबाबत इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी माहिती दिली. यानंतर शेतकºयांना फवारणी संरक्षण किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी खात्याच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यात आली. शेतकºयांनी रासायनिक खते, औषधे-बियाणे कसे खरेदी करावे, काय काळजी घ्यावी, तक्रार कोणाकडे करावी, याविषयी इगतपुरी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी मोगल यांनी माहिती देत शेतकºयाच्या शंकांचे निसरन केले. ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांनी आभार मानले.पावसाला उशिराने सुरुवात झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून पिकांवरील कीड नियंत्रण तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी व त्याचप्रमाणे पिकांवरील किड कशी ओळखावी, याविषयी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.- शीतलकुमार तवर. तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी
शेतकऱ्यांना कीड नियंत्रण व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 6:40 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात पावसाचे उशिराने आगमण झाल्यामुळे पिकांची काळजी घेण्यासाठी भरवीर बुद्रुक येथे कृषी विभागाच्या वतीने आत्मा योजनेअंतर्गत कीटकनाशक फवारणी तसेच कीड नियंत्रण व्यवस्थापन याविषयी दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुका अधिकारी शीतलकुमार तवर यांच्यासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरात कौशल्य आधारित काम करणाºया शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
ठळक मुद्देभरवीर बुद्रुक : कृषी विभागामार्फत दोनदिवसीय शिबिर