औदाणे : जादूटोणा कायदा हा कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नसुन मानवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून या कायद्याचा वापर केल्यास अनेक भोंदूबाबा गजाआड होतील असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केले(मालेआंबा) ता.बागलाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित शिक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी कार्यक्र मात अंधश्रद्धा हि देशास लागलेली कीड असुन सुशिक्षीत लोकंही अंधश्रद्धा बाळगून असल्यामुळे भोंदूबाबांचे फावते म्हणून भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व समाज अंधश्रद्धा मुक्त करा असे भावनिक आवाहनही केले.सप्रयोग व्याख्यानात त्यांनी रु मालाची काठी कशी तयार होते, वस्तु कशी गायब होते, दुधाने भरलेला ग्लास दुध पिल्यावरही रिकामाच कसा होत नाही, दोरी जोडणे,पत्ते ओळखणे,पत्ते मोठे करणे, बाहुली नाचवणे, निर्जीव वस्तु हलवणे, अंगावर बल्ब लावणे ह्यासारखे अचंबित करणारे भरपुर प्रयोग दाखवले व त्यामागील विज्ञानही सांगितले.अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्र म ठेवल्याबद्दल विस्तार अधिकारी के. एन. विसावे , केंद्रप्रमुख . आर. एन. गायकवाड, मुख्याध्यापक सुनिल कापडणीस यांनी स्वागत केले. प्रारंभी शाळेतील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्र म तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल कापडणीस यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी कैलास चित्ते, कडू जाधव, देविदास लाडे, नंदु चौरे, तुंगु चौधरी, धनाजी सोनवणे, स्वाती जाधव आदींनी प्रयत्न केले.
शिक्षण परिषदेत अंधश्रध्देवर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 7:01 PM
औदाणे : जादूटोणा कायदा हा कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नसुन मानवाच्या कल्याणासाठी आहे. म्हणून या कायद्याचा वापर केल्यास अनेक भोंदूबाबा गजाआड होतील असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी केले
ठळक मुद्देसमाज अंधश्रद्धा मुक्त करा असे भावनिक आवाहनही