सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शनिवार (दि. २३) पासून अज्ञात आजारााची लागण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गायींना झाली. या आजारामुळे आजपर्यंत खंबाळे येथील दहा ते पंधरा गायी दगावल्या आहेत. तर सुरेगावातही एक गाय दगावली. कोकणात आढळणारा बोटूलिझम (हळवा) हा आजार असण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या आजाराची लागण झाल्यानंतर खंबाळे गाव व परिसरातील एकापाठोपाठ गायी दगावत गेल्याने तालुका तसेच जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या पथकाने याचा आढावा घेतला. मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. दौंड (पुण)े येथे महाराष्टÑासह सात राज्यांतील रोग अन्वेषण विभागाला याची माहिती दिल्यानंतर तेथील पथकाने खंबाळे येथे पाहणी केली. यावेळी पथकात उपायुक्त व सहाय्यक आयुक्त पुणे, सहाय्यक आयुक्त विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुधन अधिकारी यांचा समावेश होता.
खंबाळे येथे रोग अन्वेषण पथकाचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 5:38 PM