जानोरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र म या उपक्र माव्दारे निंबोळी अर्क फवारणी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. निंबोळी अर्क म्हणजे कडूलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या) काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले अझाडिराक्टीन कीटकनाशकाचे काम करते. या निबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बºयाच किडीवर हवा तो परिणाम होतो. मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे, पाने पोखरणाच्या व देठ कुरतडणाºया अळ्या, कोबीवरील अळ्या, फळ माश्या, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो. व त्यांचा बंदोबस्त होतो. तसेच निंबोळी अर्काची फवारणी ही रासायनिक कीटकनाशकासारखी बाधक नसून पिकांसाठी फायदेशीर असते. त्यामुळे शेतकºयांनी अशा फवारणीचा वापर शेतीसाठी करावा असे कृषीकन्या वैष्णवी जाधव हिने सांगितले.या कामी महाविद्यालयाचे कीटक शास्त्रज्ञ प्रा. तुषार उगले, प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. विक्र म कोरडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मोहाडी येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.
शेतकऱ्यांना निंबोळी अर्क फवारणी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 3:02 PM
जानोरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्र म या उपक्र माव्दारे निंबोळी अर्क फवारणी याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देनिंबोळी अर्काची फवारणी पिकांसाठी फायदेशीर