लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.पेठ व दिंडोरी तालुक्यातील पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन महत्त्वाची ती कामे पावसाळ्यापूर्वीच करून घेणे आवश्यक असताना कासवगतीने सुरू असलेले काम पाऊस सुरू झाला तरी पूर्ण होऊ शकले नाही.लहान-मोठे पूल तयार करताना पर्यायी व्यवस्था केली नसल्याने उमराळे गावाजवळ तसेच सावळघाट ते पेठपर्यंत अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असते. पेठ तालुक्यातील तिघांनी गमावला जीवरासेगाव ते आशेवाडी दरम्यानच्या पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने एकेरी वाहतुकीत खासगी जीप व ट्रकच्या अपघातात पेठ तालुक्यातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले दिसून येत नाही. रस्त्याच्या मध्यभागी दगड मातीचे मोठमोठे ढिगारे टाकून रस्ता अडविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.साइडपट्ट्या कमकुवतरस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे टाकलेले भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्याने साइडपट्ट्या कमकुवत झाल्या आहेत. वाहनांची गर्दी झाल्यास अवजड वाहने याच साइडपट्ट्यावर रूतून बसतात. त्यामुळे तासन्तास वाहतुकीला अडथळे निर्माण होताना दिसून येत असून, पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने मोठ मोठ्या खडु्यातून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. सावळघाट, कोटंबीघाट, शनिमंदिर, करंजाळी, बोरवठ फाटा आदी ठिकाणी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असताना प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गुजरात महामार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:04 AM
पेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ठळक मुद्दे खोळंबा : नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल, उमराळेजवळ वाहतूक कोंडी