शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

गुजरातच्या मनोरूग्ण महिलेला मिळाले मायेचे छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 2:56 PM

देवळा : तालुक्यातील मटाणे गावात बेवारस फिरणाऱ्या एका मनोरु ग्ण महिलेच्या कुटुंबियांचा तातडीने शोध घेउन तिला त्यांच्या स्वाधीन करु न देवळा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

देवळा : तालुक्यातील मटाणे गावात बेवारस फिरणाऱ्या एका मनोरु ग्ण महिलेच्या कुटुंबियांचा तातडीने शोध घेउन तिला त्यांच्या स्वाधीन करु न देवळा पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.मटाणे शिवारात दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी दावल पवार या शेतकºयाच्या शेतातील शेडमध्ये ही महिला येउन बसली. घरातील व्यक्तींनी या महिलेची विचारपूस केली असता ती काहीच बोलत नव्हती. ही महिला मनोरूग्ण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी या महिलेला इतरत्र जाऊ न देता तेथे थांबवून ठेवले, तिच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.मटाण्याचे उपसरपंच भाऊसाहेब अहेर यांनी सदर महिलेबाबत देवळा पोलिसांना कळविले. सहा. पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपुत, सहा. पोलिस उपनिरीक्षक आर. एम. राठोड, व्ही.बी. बर्डे यांनी मटाणे येथे जावुन त्या मनोरु ग्ण महिलेला ताब्यात घेतले. सदर बाबत तेथील रहिवासी यांचे सविस्तर जबाब नोंदविले. सदर घटने बाबत नासिक ग्रामीण पोलिस अधिक्षक आरती सिंग, अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर मनोरु ग्ण महिलेस मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक यांचे न्यायालयात हजर केले असता सदर मनोरु ग्ण महिलेस वैद्यकीय उपचारासाठी नाशिक जिल्हा रु ग्णालय येथे दाखल करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. सदर महिलेस जिल्हा रु ग्णालय येथे दाखल करण्यात आले. ह्या मनोरु ग्ण मिहलेवर वैद्यकीय अधिकारी गोपाल घोडके यांनी उपचार केले. प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी तिचे सोबत संवाद साधुन तिला बोलते केले असता तिचे नाव मैनुबेन महाला असे असल्याचे व ती गुजरात राज्यातील राहणारी असल्याचे तिचे बोलीभाषेवरु न समजुन आले. पोलिसांनी तपासाची चक्र े फिरवून गुजरात राज्यातील पोलिसांशी संपक; साधुन सदर महिले बाबत माहिती मिळवली असता सदर महिला वाजदा पोलीस स्टेशन हद्दीतील राहणार असल्याचे समजुन आले. तसेच तिचे कुटुबिय मुले हेमंत प्रभुभाई महाला, व विमल प्रभुभाई महाला, (रा. उमरकुई, ता. वाजदा, जिल्हा. बलसाड ) यांचेशी संर्पक साधुन त्यांना सदर महिले बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. दि. १ सप्टेंबर रोजी सदर महिला मैनुबेन प्रभुभाई महाला हिचे वारस मिळुन आल्याने तसेच तिचे प्रकृतित सुधारणा दिसुन आल्यानंतर या महिलेला न्यायालयात हजर केले असता नातेवाईकां बाबत खात्री करु न तिला नातेवाईकांचे ताब्यात देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले. यानंतर देवळा पोलिसांनी हया महिलेस तिचे नातेवाईकांचे ताब्यात दिले.

टॅग्स :Nashikनाशिक