शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

वाहतूक पोलिसांनी दिले तिळगूळसह गुलाबपुष्प

By admin | Published: January 15, 2017 1:19 AM

हॅप्पी संक्रांत : रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत अशीही गांधीगिरी

नाशिक : एरवी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या हातात केवळ दंडात्मक कारवाई केल्याच्या पावत्या दिल्या जातात. मात्र, शनिवारी मकरसंक्रांतीचे औचित्य साधत वाहतूक पोलिसांनी विविध सिग्नलवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्याने नाशिककरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांच्या जनप्रबोधनाची गांधीगिरी बघून नागरिक अवाक् झाले.रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध आगळेवेगळे जनप्रबोधनाचे उपक्रम वाहतूक पोलिसांकडून सध्या शहरात राबविले जात आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधत शनिवारी हेल्मेटधारक दुचाकीस्वारांना विविध सिग्नलवर पोलिसांनी गुलाबपुष्प व तिळगूळ वाटप करत ‘हॅपी संक्रांत’ म्हणून शुभेच्छा दिल्या. दुचाकी चालविताना ‘हेल्मेट वापरा, अपघातात होणारा मृत्यू टाळा,’ ‘हेल्मेट है जरूरी, ना समजो इसे मजबुरी’, ‘सीट बेल्ट वापरा, सुरक्षित राहा,’ दारू पिऊन वाहने चालवू नका, ‘रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्या’, ‘वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा’ अशा प्रकारच्या सूचना देत शुभेच्छा दिल्या. तसेच तिळगुळासोबत छापील सूचनांचे शुभेच्छापत्रही वाटप करण्यात आले. पोलिसांची ही गांधीगिरी बघून बहुतांश लोक थक्क झाले. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे नागरिकांनी पालन करावे, हा रस्ता सुरक्षा सप्ताहचा मुख्य उद्देश असून, या अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा विविध उपक्रम राबवित आहे. वाहनांना प्रबोधनपर स्टिकर लावणे, हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांकडून निबंध लिहून घेणे तसेच त्यांना मोफत भविष्य सांगणे अशा प्रकारचे गांधीगिरी स्टाईलने सध्या वाहतूक पोलिसांकडून जनप्रबोधन केले जात आहे.