सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या उद्योगभवन कार्यालयास बुधवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी स्टाईसच्या संचालक मंडळाने पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे यांनी स्टाईसच्या कामकाजाची माहिती दिली. स्टाईसला वाढीव घनमीटर पाणी परवानगी मिळणे, विदर्भ-मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांचाही २९ जून २०१६ च्या शासन निर्णयात समावेश करणे, औद्योगिक वसाहत परिसरात दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात आदी मागण्यांचे निवेदन सहकार राज्यमंत्री पाटील यांना देण्यात आले. स्टाईसच्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी स्टाईसचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष किशोर देशमुख, संचालक संदीप आवारे, रामदास दराडे, पंडीत लोंढे, सुनील कुंदे, प्रभाकर बडगुजर, अविनाश तांबे, मीनाक्षी दळवी, उद्योजक बाबासाहेब दळवी, विष्णू खताळे, प्रमोद महाजन, भीमराव हांडोरे, रामनाथ पावसे, अविनाश कांडेकर, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदी उपस्थित होते. स्टाईसचे अध्यक्ष चव्हाणके यांनी आभार मानले. (वार्ताहर)
स्टाईस कार्यालयास गुलाबराव पाटील यांची भेट
By admin | Published: October 26, 2016 11:20 PM