पंचवटी : येथील पंचवटी परिसरात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिंडोरीरोड विजयनगर मित्रमंडळ व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. दत्ता सानप यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. देशातील कोरोना संसर्ग लक्षात घेऊन सर्व नियम पाळले जाऊन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला रोहित गोसावी, मेघराज भोसले, पप्पू गोसावी, कल्पेश बेंडाळे, विकी लष्करे, यश माळवे, अभिषेक डेंगळे, अतिश वानखेडे, प्रशांत साळवे, ललित कुंभारकर, स्वप्नील उमाळे, दिलीप कोल्हे, स्वप्नील कोलमकर उपस्थित होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आमदार ॲड. राहुल ढिकले, सुनील बागुल, माजी आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कमलेश बोडके, गुरुमित बग्गा, ज्ञानेश्वर बोडके, संजय बागुल, महेश अहेर, विशाल बनकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ममुन्ना कोकाटे, योगेश पाटील, सागर बागुल, अमित खांदवे, विलास आहेर, सदानंद पवार, गोपी नागरे, दर्शन जाधव, भारत जेऊघाले, विशाल कर्पे, अण्णा हांडगे, राहुल गुंजाळ यांनी केले होते.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक प्रियंका माने यांच्या संपर्क कार्यालय येथे प्रतिमा पूजन महाराजांची आरती करण्यात आली. कार्यक्रमाला चिटणीस धनंजय माने, अमित घुगे, संतोष नेरे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, पंढरीनाथ चासकर, विलास दांदले, भीमराव केदारे, करण गर्दे, वैभव सूर्यवंशी, तेजस पाटील उपस्थित होते.
औरंगाबादरोड नांदूर नाका येथे नांदूर, मानूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिवजयंती निमित्ताने शिवव्याख्याते प्रकाश बर्डे पाटील, वैष्णवी खताळे यांचे शिव चरित्रावर व्याख्यान तसेच सागर महाराज दिंडे यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम व पालखी सोहळा संपन्न झाला. पंचवटीत पेठरोड, मालेगाव स्टॅण्ड, मेरी, म्हसरूळ, मखमलाबाद, आडगाव, नवीन आडगाव नाका, हिरावाडी, कमलनगर, जुना आडगाव नाका, रोकडोबा मैदान, दिंडोरी नाका आदी ठिकाणी शिवाजी महाराज पुतळे स्थापन करीत पूजन करण्यात येऊन शिवजयंती साजरी करण्यात आली.
---इन्फो बॉक्स---
चोफेर फलकबाजी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पंचवटी परिसरात सर्वत्र फलक लावण्यात आले आहेत. चौकाचौकात शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे पताका लावल्याने परिसर भगवेमय झाला आहे. बालकांनी सायकलवर भगवा पताका मिरवत भगवे झेंडे लावले होते. (फोटो:१९पंचवटी शिवजयंती)