लोहोणेर : संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या गुंजाळनगरच्या सरपंचपदी सीमा दत्तात्रय भवर यांची, तर उपसरपंचपदी सुजाता सतीश गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विकास सोसायटीचे अध्यक्ष देवाजी गुंजाळ, माजी उपसरपंच सतीश गुंजाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमत मिळविले होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बुधवारी (दि. २०) ग्रामपंचायत सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेदहा वाजता बोलावण्यात आली होती. निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी सीमा भवर व उपसरपंचपदासाठी सुजाता गुंजाळ यांचेच अर्ज दाखल झाल्याने उभयतांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. बैठकीस नूतन सदस्य डॉ. राजेंद्र गुंजाळ, ज्योती गुंजाळ, सुशीला गुंजाळ, दत्तात्रय भवर, छोटू साबळे आदि उपस्थित होते. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष देवाजी गुंजाळ, माजी उपसरपंच सतीश गुंजाळ, विनोद अहेर, भिका गुंजाळ, रमेश गुंजाळ, रामराव गुंजाळ, रामदास गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, माजी पोलीसपाटील हिरामण गांगुर्डे, बाळू जाधव, बाळासाहेब गुंजाळ, तुषार गुंजाळ, बाजीराव देवरे, राजेंद्र गुंजाळ, चेतन गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, दीपक देवरे, सतीश गांगुर्डे, बंडू उगले, भाऊसाहेब देवरे, नितीन गुंजाळ, आबा धोंडगे, धनाजी धोंडगे, संजय जाधव, साहेबराव बच्छाव, दीपक गुंजाळ, रामदास देवरे, दिलीप अहेर, तसेच बाजार समितीचे माजी सभापती योगेश अहेर, जितेंद्र अहेर, लक्ष्मीकांत अहेर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
गुंजाळनगरच्या सरपंचपदी सीमा भवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 12:03 AM