शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

सेना दिवसाच्या औचित्यावर भावी पिढीने न्याहाळल्या तोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 6:30 PM

केंद्रातून दरवर्षी शेकडो सैनिक देशसेवेत दाखल होतात. आधुनिक तोफा चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. भारतातील क्रमांक-१चे तोफखाना केंद्र म्हणून याची ओळख आहे.

ठळक मुद्देदेशसेवा करण्याची प्रेरणा घेतली.जाणून घेतली सैन्य भरतीची माहितीविद्यार्थ्यांनाही भारतीय सेनेविषयी अभिमान वाटला

नाशिक : देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना केंद्रात सैन्य दिनाच्या निमित्ताने बुधवारी (दि.१५) भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शित तोफा, मशीनगन, बंदूक आदींची माहिती जवानांकडून जाणून घेत लष्करी शिस्त अन् सामर्थ्यामधून सैन्य दलात जाऊन देशसेवा करण्याची प्रेरणा घेतली.दरवर्षी १५ जानेवारी रोजी सैन्य दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी एक छोटेखानी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या केंद्रातून दरवर्षी शेकडो सैनिक देशसेवेत दाखल होतात. आधुनिक तोफा चालविण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाते. भारतातील क्रमांक-१चे तोफखाना केंद्र म्हणून याची ओळख आहे. केंद्राच्या उमराव कवायत मैदानावर हाऊजर, बोफोर्स, रॉकेट लॉन्चर, १३० एम.एम. रशियन एम-४६ गन या तोफांसह रायफल, लहान-मोठ्या बंदुका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. या तोफांची वैशिष्ट्ये यावेळी जवानांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. रॉकेट लॉँचरचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी किमान १४ अग्निबाण डागण्याची क्षमता थेट २० हजार ४०० किलोमीटरपर्यंत ठेवतो. बोफोर्स तोफ अत्याधुनिक असून, अवघ्या दहा ते बारा सेकंदात बॉम्बद्वारे अचूक वेध घेण्याची क्षमता या तोफमध्ये आहे. अतिउंच ठिकाणांवरील तसेच डोंगराळ भागातील शत्रूंच्या तळावर उखळी मारा ही तोफ करते. बोफोर्स तोफ द्वार भारतीय सैन्याने कारगिल युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारत विजय मिळविला होता. तोफखाना केंद्रातील केंद्रीय विद्यालय, तोपची प्री-प्रायमरी आर्मी स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, देवळाली कॅम्प, भोसला मिलिटरी स्कूल आदी शाळांच्या विद्यार्थ्यांनी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत प्रदर्शनाला भेट दिली.जाणून घेतली सैन्य भरतीची माहितीप्रदर्शनादरम्यान भारतीय सेनेच्या भूदल, वायुदल, नौदलात भरती होण्यासाठी लागणारी शैक्षणिक, शारीरिक पात्रतेबाबतची सर्व माहिती यावेळी प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच तीनही सैन्य दलाचे वैशिष्ट्यांसह त्यांची भूमिकादेखील यावेळी मांडण्यात आली होती. तोफखाना केंद्राची स्थापना १९४८ साली नाशिकरोडला करण्यात आली. या केंद्राचा इतिहास रेजिमेंट आॅफ आर्टिलरीच्या विकासाशी जोडलेला आहे. याबाबतही विद्यार्थ्यांना अवगत करण्यात आले. १९५० साली या केंद्राचे नाव इंडियन आर्टिलरी असे करण्यात आले. तत्पूर्वी रॉयल इंडियन आर्टिलरी सेंटर असे नाव होते. भारताच्या तोफांचे सामर्थ्य बघून विद्यार्थ्यांनाही भारतीय सेनेविषयी अभिमान वाटला.

टॅग्स :NashikनाशिकIndian Army Dayभारतीय सैन्य दिन