बुधवारी सभापती बडोदे यांनी वडाळा गावातील अण्णाभाऊ साठे नगरसह परिसराची पाहणी केली. महेबूब नगर, एस. एन. पार्क, मदिनानगर, गरीब नवाब मशिदीच्या मागील परिसराला भेट दिली. या भागात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल, तसेच गुंठेवारी प्लॉट धारकास नवीन नियमानुसार बांधकाम कायम करून नियमानुसार परवानगी देऊन घरपट्टी लावावी. त्यासाठी बांधकामासाठी नागरिकांना अधिकाऱ्यांनी सहकार्य करून माहिती द्यावी, अशी सूचना सभापतींनी दिली. यावेळी सभागृहनेते सतीश सोनवणे, नगरसेविका दीपाली कुलकर्णी, नगरसेविका सुप्रिया खोडे, राम बडोदे, सुजित मोरे, विभागीय अधिकारी स्वप्निल मुदलवाडकर, अभियंता जितेंद्र पाटोळे, रवींद्र धारणकर, खाडे, जगताप आदी उपस्थित होते.
गुंठेवारी प्लॉटधारकांना घरपट्टी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:13 AM