शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

७२ लाखांचा गुटखा पोलिसांकडून जप्त

By admin | Published: November 22, 2015 11:39 PM

भद्रकाली पोलिसांची कामगिरी : द्वारकावर रोखले पॅकबॉडीचे ट्रक; चालकांना अटक

नाशिक : हैदराबादहून नाशकातील ओझर येथे ट्रकने पोहोचविला जाणारा लाखोंचा गुटखा भद्रकाली पोलिसांनी सकाळी नऊ वाजता द्वारका येथे सापळा रचून जप्त केला. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी गुटख्याच्या खोक्यांनी भरलेले दोन्ही ट्रक ताब्यात घेतले. दोन्ही ट्रकमधील ७२ लाखांचा गुटखा दोन्ही ट्रकसह पोलिसांनी जप्त केल्या असून एकूण ९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हैदराबाद शहरातून हिरा पान मसाला, बाबा गुटखा, रॉयल ७१७ तंबाखुच्या पुड्यांचे शेकडो खोके भरून दोन्ही ट्रक मुंबईमार्गे सकाळी नाशिक मध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ नियोजन करून पथक तयार केले आणि द्वारका परिसरात सापळा रचला. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास द्वारका चौकात आलेले ट्रक (एमएच ४३ वाय १४३५) व (एमएच ४३ वाय ३५३७) पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अडविले. ट्रकचालक जगन्नाथ मळी अलप्पा (वय ४५, रा. कल्लुर, कर्नाटक), मेराज हुसेन सय्यद (वय ३५, रा. राजुरेश्वर, कर्नाटक) यांना तत्काळ ताब्यात घेतले आहे.पोलीस बंदोबस्तामध्ये गुटख्याचे भरलेले ट्रक भद्रकाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, पोलीस हवालदार चव्हाण, शेरू पठाण, मनोज डोंगरे, सातपुते, सोनार, पालिका अन्न औषध विभागाचे सुरक्षा अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी आदिंनी सहभाग घेतला. दिवसभर पंचनामा सुरू होता. संध्याकाळी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)पोलीस ठाण्याच्या सभागृहात रचून ठेवलेली गुटख्याची पोती. दुसऱ्या छायाचित्रात पोलीस ठाण्यात ट्रकमधून गुटख्याचे खोके उतरविताना मजूर.