शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुरुदत्त पॅनल विजयी

By admin | Published: May 23, 2016 10:47 PM

वडाळीभोई सोसायटी निवडणूक : १२ जागांवर सत्ता

सोग्रस : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत कादवा कारखान्याचे संचालक सुखदेव जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्री गुरुदत्त पॅनलने १२ जागांवर विजय मिळाला तर शेतकरी विकास पॅनलला एकेच जागेवर समाधान मानावे लागले.श्री गुरुदत्त पॅनलचे विजयी उमेदवार सुशीला दिलीप अहेर, सिंधूबाई संतोष जाधव, सुखदेव दशरथ जाधव, राजाराम जमन गांगुर्डे, सुनील भास्कर जाधव, लक्ष्मण भागुजी जाधव, शिवाजी दौलत जाधव, रघुनाथ पोपट जाधव, दिलीप रायाजी अहेर, निवृत्ती सीताराम जाधव, भाऊसाहेब भास्कर अहेर, शिवाजी रघुनाथ अहेर, तर शेतकरी विकास पॅनलचे विश्वनाथ ठकाजी झाडे हे एकमेव उमेदवार बिनविरोध निवडून आले. श्री गुरुदत्त पॅनलचे नेतृत्व कादवाचे संचालक सुखदेव जाधव, सरपंच नवनाथ जाधव, माजी सरपंच निवृत्ती घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले, तर शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व कृउबाचे उपसभापती नितीन अहेर, कारभारी अहेर, जिल्हा परिषद सदस्य बंडू गांगुर्डे, मधुकर जाधव, अशोक जाधव यांनी केले. यावेळी चांदवड पंचायत समितीच्या सभापती अनिता जाधव, संदीप जाधव, शंकर जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य आदिंसह ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला, तर निवडणूक अधिकारी म्हणून आर.एन. दवते यांनी काम बघितले. त्यांना सहकार्य सचिव बी.पी. झारोळे, अरुण जाधव यांनी केले. (वार्ताहर)