शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुरुजींची गर्दी, संसर्गाला वर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : राज्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरवर शिक्षण विभागाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत असून, शिक्षकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पार उल्लंघन होऊन एकप्रकारे कोरोना संसर्गालाच वर्दी दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : राज्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षिततेची पायरी म्हणून शिक्षकांच्या कोविड चाचण्या करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक कोविड केअर सेंटरवर शिक्षण विभागाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत असून, शिक्षकांच्या गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पार उल्लंघन होऊन एकप्रकारे कोरोना संसर्गालाच वर्दी दिली जात आहे.निफाड तालुक्यातील शिक्षकांच्या तपासणीसाठी योग्य नियोजन न केल्याने पिंपळगाव येथील कोविड सेंटरमध्ये शेकडो शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत निफाड येथील गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांच्याशी संपर्क साधला असता तपासणीसाठी नेमके शिक्षक किती हेच माहीत नसल्याने हा गोंधळ झाला असल्याचे सांगत विभागाच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडविले.इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने शिक्षकांना शाळेतून बोलावणे आले व कोविड चाचणी शासनाच्या कोविड सेंटरमध्ये करावी. अशी सूचना करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून हे निर्देश दिल्यानंतर कोविड सेंटरचे डॉ. चेतन काळे यांनी गटशिक्षणाधिकारी तुंगार यांना प्रतिदिवस २०० शिक्षकांना तपासणीसाठी पाठवण्याचे नियोजन सांगितले, मात्र कोणतेही नियोजन न केल्याने निफाड तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक पिंपळगाव येथे चाचणीसाठी एकाच दिवशी आल्याने तिथे शेकडो शिक्षकांची गर्दी झाली. परिणामी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाला हरताळ फासत शिक्षकांकडूनच नियमांचे उल्लंघन झाले. मग शाळा सुरू झाल्यावर नियमांचे पालन होईल काय, मुलांचे आरोग्य सुरक्षित राहील काय, असा सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे..........................................................चौकट.....गर्दीमुळे वाढली संसर्गाची भीतीह्ण.....चाचणी केंद्रावरील शिक्षकांच्या गर्दीमुळे संसर्गाची भीती असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षकांनी दिली. सर्व शिक्षकांच्या चाचण्या २ ते ३ दिवसांत होणे अशक्य आहे. अनेक शिक्षक मूळ गावी सुट्टीसाठी असल्याने शिक्षण विभागाने शाळांना १५ दिवसांचा वेळ द्यावा आणि नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, शिक्षकांनी कोठेही केलेल्या चाचणीचा अहवाल कोणत्याही हद्दीत ग्राह्य धरावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली.---------------------------------------------तपासणीसाठी आलेल्या शिक्षकांमध्येच वाद..शिक्षकांची कोविड तपासणी करण्यासाठी निफाड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने गटशिक्षणाधिकारी तुंगार यांच्याकडे नियोजन कसे करावे याबाबत सूचना दिल्या; पण तुंगार यांनी याचे कोणतेही नियोजन न केल्याने शेकडो शिक्षकांनी शुक्रवारी कोविड सेंटरला गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे शिक्षकांकडूनच उल्लंघन झाले आणि रांगेत उभे राहण्यावरून शिक्षकांमध्येच बाचाबाची होत वाद झाले. त्यामुळे शिक्षकांच्या शिस्तीला गालबोट लागले.----------------------------------------------कोट.....गुरुवारी २१० शिक्षकांचे स्वॅब घेतले, आम्हाला साडेबारा वाजेपर्यंत स्वॅब घेऊन ते नाशिकला पाठवावे लागतात. आम्ही गटशिक्षणाधिकारी तुंगार यांना रोज २०० शिक्षक पाठवा, असे सांगितले होते, इथे एकाच दिवशी गर्दी केल्याने उपलब्ध मनुष्यबळानुसार आम्हाला हे काम करताना मर्यादा येत आहेत.- डॉ. चेतन काळे, कोविड सेंटरप्रमुख------------------------------------------निफाड तालुक्यात नववी ते बारावीचे किती शिक्षक आहेत हे सांगणे कठीण आहे. कोरोना तपासणीसाठी इयत्ता पाचवीचेसुद्धा शिक्षक जात आहेत. त्यामुळे कोविड सेंटरला गर्दी झाली आहे. शिक्षकांनी सहकार्य करावे व ज्या पद्धतीने नियोजन केले आहे त्यानुसार तपासणी करून घ्यावी.- केशव तुंगार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, निफाड

टॅग्स :Nashikनाशिक