लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील अनेक शाळांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे तसेच गुरूपूजन सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वाघ गुरुजी शाळावाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर व आदर्श शिशुविहार या शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापक वनिता पाटील यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. अर्चना देवरे यांनी महर्षी व्यास व विविध गुरू-शिष्यांच्या नात्याविषयी माहिती सांगून गुरू-शिष्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी गुरू-शिष्याच्या जसे जिजामाता-छत्रपती शिवराय, रामदास स्वामी- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले- सावित्रीबाई फुले, द्रोणाचार्य- एकलव्य, धौम्य ऋषी- आरुणी आदी विविध वेशभूषेत आलेले होते. सूत्रसंचालन माधुरी धोंडगे यांनी केले.न्यू मराठा हायस्कूलभारतीय संस्कृतीमध्ये गुरूला आदराचे स्थान आहे. आपला हाच आदर न्यू मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमातून दाखविला. गुरुपौर्णिमानिमित्ताने शालेय मंत्रिमंडळाने सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन आदर व्यक्त केला. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रार्थना, गीत, कविता, गुरूचे महत्त्व यावर अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका पी. टी. भागवत, एस. एस. संगमनेरे, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अभिनव उपक्रमगुरुपौर्णिमेनिमित्त आर्ट आॅफ शितल यांच्या वतीने रविवार (दि. ९) सायंकाळी ५.३० वाजता गंगापूररोड-वरील सहदेव नगर येथे दत्त चौकात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हा संत तुकाराम महाराजांच्या विचारांशी बांधिलकी जोडण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:
By admin | Published: July 09, 2017 12:48 AM