महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला वा तत्सम अन्नपदार्थ चोरीछुप्या मार्गाने राज्यात अवैधरीत्या आणून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने वेळोवेळी अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करून या व्यावसायिकांची दुकाने, टपऱ्या सीलबंद केल्या आहेत, तर काहींचा अन्न परवाना रद्द केला आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मागील वर्षभरात विविध ५३ ठिकाणी छापे टाकून सुमारे ३ कोटी ६७ लाख ६ हजार ८३७ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ सील केला आहे. त्यापैकी ४४ ठिकाणे सीलबंद करण्यात आली, तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ वाहतूक करणारी ९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. अन्न व्यावसायिकांनी कायद्यातील तरतुदींचे पालन करून व्यवसाय करावा, जनतेच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी दिला आहे.
वर्षभरात साडेतीन कोटींचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:17 AM