पाच रुपये किंमत असलेला गुटखा २० रुपये भावाने विक्री होत आहे तर दहा रुपये किमतीची गायछाप पुडी ३० ते ४० रुपये देऊन खरेदी केली जात आहे. कोरोना काळात अनेक छोटेमोठे उद्योग बंद पडले, तरुण बेरोजगार झाले. कुटुंबाला लागणारा खर्च करण्याची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे तरुणाई नैराश्य दूर करण्यासाठी व्यसनांकडे वळाल्याचे दिसून येत आहे. गुटखा विक्री बंद करण्यात आली असली तरी तयार करणारे कारखाने बंद करण्यात आले नाहीत. त्यामुळे अमली पदार्थ उत्पादन चालूच असून टपरी, दुकानात ते छुप्या मार्गाने विक्री केले जात आहे. पोलीस यंत्रणेलाही विक्रीची दुकाने माहिती असून देखील कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. छुप्या मार्गाने सुरु असलेली विक्री थांबविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.
ग्रामीण भागात छुप्या मार्गाने गुटखा विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:15 AM