शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

नाशिक-पेठ मार्गावर लाखोंचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:19 AM

गुजरातहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असून गेल्याच आठवड्यात दिंडोरी पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला होता. नाशिक-पेठ-धरमपूर मार्गाने ...

गुजरातहून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असून गेल्याच आठवड्यात दिंडोरी पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला होता. नाशिक-पेठ-धरमपूर मार्गाने गुजरातकडून चोरट्या मार्गाने बेकायदारित्या पिकअप (क्रमांक एमएच १५ एचएच १०८७) नाशिककडे येत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोळशी टोलनाक्यावर वाहतूक शाखेच्या पथकाने गाडी थांबवून तपासणी केली. यावेळी सुंगधी तंबाखू व विमल गुटखा गोण्या आढळून आल्या असून वाहनासह २१ लाख ८० हजार ९२० रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मुद्देमालासह वाहन दिंडोरी पोलिसांत जमा करण्यात आले असून, वाहनचालक मुझेद्दिम शेख याला ताब्यात घेण्यात आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख, पोलीस नाईक सागर सौदागर, पोलीस कॉस्टेबल दत्तू शिंदे, रूपेश कांबळे, चालक शिंपी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

फोटो- ०८ दिंडोरी गुटखा

गोळशी फाटा येथे अवैध गुटखा व तंबाखू वाहतूकप्रकरणी संशयित आरोपीसमवेत पोलीस उपनिरीक्षक कैलास देशमुख, सागर सौदागर, दत्तू शिंदे, रूपेश कांबळे, दिलीप पगार, शिंपी आदी.