पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई असा नावलौकिक असणाºया पिंपळगाव बसवंत शहराला विविध समस्यांचे ग्रहण लागले असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे.अंबिकानगर परिसरात शौचालयाची दुरवस्था, आरोग्य केंद्र बंद अवस्थेत, गटारी तुडुंब भरलेल्या आहेत.ग्रामपंचायतीने उभारलेल्या शौचालयाची अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली आहे. दरवाजे तुटलेले, परिसर गलिच्छ अवस्थेत व आजूबाजूला अस्वच्छता दिसून येते. तसेच परिसरातील गटारी तुडुंब भरल्याने येथील नागरिकांना रोगराईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यातच येथील आरोग्य केंद्र गेल्या कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. दोन किमी पायपीट करत जावे लागत आहे. तेथेही माणूस पाहून रुग्णाचा इलाज केला जात आहे. सरकारी रुग्णालय असूनदेखील औषधे बाहेरून आणावी लागत असल्याचे नागरिक सांगतात, त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. याचा मोठा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र अंबिकानगर येथील आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन धूळ खात अवस्थेत असलेले आरोग्य केंद्र, शौचालय व तुंबलेल्या गटारींबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.पिंपळगाव बसवंत शहर परिसरात वाहतूक कोंडी, मोकाट जनावरांची वाढती संख्या यामुळे नागरिकांमध्ये जनावरांबाबत दहशत, शौचालयाची दुरवस्था, मनाडी नाल्याची दुरवस्था, डंपिंग ग्राउंडला संरक्षक भिंत नसल्याकारणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तर महादेववाडीनगर येथे पाण्याचा तुटवडा, चिंचखेड चौफुलीवरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.समस्यांचा वाढता प्रभाव शहरात दिसून येत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण होण्यासाठी मागणी होत असल्याचे म्हटले जात आहे; पण प्रशासन याकडे उदासीनता दाखवित असल्याची शहरात चर्चा आहे.(उद्या : निफाड)मंनाडी नाल्याची दुरवस्था....शिवाजी शॉपिंग सेंटर परिसरमंनाडी नाल्याची व्यविस्थत स्वच्छता झाली नसल्याने यात मोठया प्रमाणावर कचरा व गाळ साचल्याने पावसाळ्यात मनाडी तुडुंब भरून थेट जुना आग्ररोड परिसरात पाणी येत शिवाजी शॉपिंग सेंटर मधील दुकानात पाणी घुसत असल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याने मनाडी नाली स्वच्छताचा प्रश पुन्हा ऐरणीवर आला आहे .
गटारी तुडुंब होऊन रस्त्यावर पाणी; दुर्गंधीसह कचऱ्याचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:10 PM
पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व नाशिक जिल्ह्यातील मिनी दुबई असा नावलौकिक असणाºया पिंपळगाव बसवंत शहराला विविध समस्यांचे ग्रहण लागले असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : शौचालयाची दुरवस्था, आरोग्य केंद्र बंद असल्याने गैरसोय