शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

गुळवंच : कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडून जप्तीच्या कारवाईस प्रारंभ ‘इंडिया बुल्स’ने थकविला दहा कोटींचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे.

ठळक मुद्देझेरॉक्स मशीन ताब्यात घेऊन जप्तीच्या कारवाईस प्रारंभमालमत्ता कर भरला नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे

गुळवंच : सिन्नर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) इंडिया बुल्स कंपनीने गुळवंच ग्रामपंचायतीचा सुमारे दहा वर्षांत दहा कोटी ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर (घरपट्टी) थकविला आहे. कर मागणी करण्यासह नोटिसा बजावूनही कंपनी दाद देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने जप्तीचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी इंडिया बुल्सच्या कार्यालयात जाऊन एक झेरॉक्स मशीन ताब्यात घेऊन जप्तीच्या कारवाईस प्रारंभ केला. या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. २००७ साली सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात विशेष आर्थिक क्षेत्राचे (सेझ) पदार्पण झाले. एमआयडीसीने इंडिया बुल्सला गुळवंच शिवारातील ३०५ हेक्टर क्षेत्र ९५ वर्षांच्या भाडेकरारावर दिले. या मालमत्तेवर गुळवंच ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारणी केली. मात्र २००७ पासून इंडिया बुल्सने अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर थकबाकी भरण्यासाठी गुळवंच ग्रामपंचायतीने इंडिया बुल्सला तीन नोटिसाही बजावल्या होत्या. यावर्षीही मालमत्ता कर मागणी करण्यात आली होती. मात्र इंडिया बुल्सकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी २० फेबु्रवारीच्या मासिक बैठकीत जप्तीचा निर्णय घेतला. १७ मार्च रोजी ग्रामपंचायत प्रशासनाने इंडिया बुल्सकडे महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ (३) प्रमाणे जप्ती करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्त घेऊन सरपंच कविता सानप, उपसरपंच भाऊदास शिरसाठ, ग्रामविकास अधिकारी अनिल कानवडे, सदस्य केशव कांगणे, संतोष कांगणे, भगवान सानप, परशराम कांगणे इंडिया बुल्सच्या कार्यालयात गेले. याठिकाणी पंचनामा करीत कंपनीतील कॅनॉन कंपनीचे नादुरुस्त झेरॉक्स मशीन जप्त केले. मालमत्ता कर भरण्यासाठी इंडिया बुल्स कंपनीकडे कर मागणीसह वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळला नाही. यासंदर्भात महाराष्टÑ शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. सेझमध्ये मालमत्ता करात कोणतीही सूट नसल्याचे पत्र ग्रामविकास मंत्रालयाकडून आले. मार्च एण्ड असल्याने मालमत्ता कर थकबाकीपोटी जप्तीची कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली.- अनिल कानवडे, ग्रामविकास अधिकारी, गुळवंच