नाशिक : प्रतिवर्षी दूरशिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तीला तसेच शैक्षणिक संस्थेला ‘ज्ञानदीप’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्यांना शिक्षण देणे, संशोधन करणे यासाठी ‘ज्ञानदीप पुरस्कार’ दिला जातो. या क्षेत्रात काम करणाºया इच्छुकांनी त्यासाठी आपल्या कार्याची माहिती दिनांक ११ मेपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इच्छुकांनी आपल्या अर्जासोबत कार्याचे दृकश्राव्य रेकार्डिंग, वृत्तपत्र कात्रणे, फोटो तसेच स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो पाठविणे आवश्यक आहे. डॉ. विजया पाटील, प्रभारी संचालक, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, गोवर्धन, गंगापूर धरणाजवळ, येथे प्रस्ताव पाठविण्याचे, अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठाकडून ‘ज्ञानदीप’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:54 AM