नाशिक : संत ज्ञानदेव म्हणजे मराठी शारदेला पडलेले स्वप्न आहे. २२ वर्षांच्या आयुष्यात ज्ञानदेवांनी धर्मजागरण, चिकित्सा, समन्वयाचे कार्य केले, त्यास उपमा काय द्यायची, असा प्रश्न पडत असल्याचे प्रा. शिरीष गंधे यांनी सांगितले. अभियंता दिनानिमित्त निवृत्त अभियंता संघ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी, पसायदान, कुंभमेळा बंध-अनुबंध याविषयांवर बोलत होते. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्यातील ४० पिढ्यांतील संबंध त्यांनी यावेळी स्पष्ट करून सांगितला. कुटुंबात संवाद दुरापास्त झाला असून, संवादाअभावी नात्यातील गोडवा कमी होत असल्याचे त्यांनी म्हटले. शेखर परांजपे यांनी गझल सादर केल्या. कार्यक्रमाला अरविंद गडाख, अशोक जैन आदि उपस्थित होते.
ज्ञानदेव हे शारदेला पडलेले स्वप्न : गंधे
By admin | Updated: October 8, 2015 00:28 IST