शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

एच. ए. एल. प्रलंबित वेतन करारासाठी कामगारांचे संरक्षण मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 5:50 PM

ओझर : देशातील एच. ए. एल.च्या सर्व कामगार संघटनांनी त्यांच्या प्रलंबित वेतन करारसाठी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेत निवेदन दिले.

ठळक मुद्देअधिकारी वर्गाला चांगली वेतनवाढ असताना कामगारांना का नाही.

ओझर : देशातील एच. ए. एल.च्या सर्व कामगार संघटनांनी त्यांच्या प्रलंबित वेतन करारसाठी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग व राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेत निवेदन दिले.देशातील एकूण नऊ विभागातील १९००० कामगारांचा एक जुलै २०१७ पासूनचा वेतन करार अद्याप प्रलंबित आहे. सदर वेतन करारासाठी उच्च व्यवस्थानाबरोबर अखिल भारतीय एच.ए.एल. कामगार समन्वय समितीची बोलणी मागील अठरा महिन्यापासून सुरू होती. चर्चेच्या सहा फेऱ्या होऊनही व्यवस्थापनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.विशेष म्हणजे अधिकारी वर्गाला भरघोस वेतनवाढ मिळाल्यानंतर कामगारांना अतिशय तुटपुंजी वाढ देऊ केली होती. अधिकारी वर्गाला चांगली वेतनवाढ असताना कामगारांना का नाही.विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना पस्तीस टक्के वाढ केली असताना, कामगारांची केवळ सहा टक्केच का असा सवाल उपस्थित झाला. मागील महिन्यात याकरीता एक आठवडा साखळी उपोषण केले होते.आता १८ जुलै नंतर एक दिवस लाक्षणिक संपावर जाण्याची नोटीस सर्व विभागातील व्यवस्थानाला देण्यात आलेली आहे. त्यांनी विलंब केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.सदर चर्चेत आमदार अनिल कदम, खासदार भारती पवार, हेमंत गोडसे, सरचिटणीस सचिन ढोमसे, अध्यक्ष भानुदास शेळके यांचे सह देशभरातील एच ए एल कामगार नेते उपस्थित होते.चौकटआय विल लूक इंटू ट..सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या दालनात बैठक झाली. तेव्हा त्यांना एकूण परिस्थितीबाबत सात-आठ मिनिटात सांगितले. त्यावर त्यांनी वेतन करारबाबत दोन तीन प्रश्न विचारले आणि शेवटी आय विल लूक इंटू ट इतकेच बोलून चर्चेला पूर्णविराम देत निवेदन स्वीकारून ते निघून गेले. दुसरीकडे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नाशिक किंवा बेंगलोर येथे भेट देऊन मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले.