लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : ममदापूर शिवारात पाण्याच्या शोधात हरीण विहिरीत पडून ठार झाले. येथील शेतकरी भानुदास वैद्य सकाळी शेतात गेले असता आपल्या विहिरीत त्यांना हरीण पडलेले दिसले. हरीण मृत अवस्थेत होते. त्यांनी लगेच वन्यजीव संवर्धन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांना फोन करून हरीण विहिरीत पडलेले असल्याचे सांगितले. गायकवाड आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. हरीण विहिरीत पडले असून, त्याचा पाण्यात बडून मृत्यू झालेला होता हे स्पष्ट झाले. हरणांचा कळप नेहमी पाण्याच्या शोधात परिसरात भटकत असतो. विहिरीत पडून मृत झालेल्या हरणाला वन्यजीव संवर्धन संरक्षण समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्यासह सदस्य बापू वाघ, नाना आहिरे, बबलू आहिरे, भानुदास वैद्य, वैभव गायकवाड यांनी विहिरीत उतरून बाजेच्या साहाय्याने बाहेर काढले. मयत झालेले हरीण २.५ ते ३ वर्षे वयाचे असून, वनसेवक पोपट वाघ, मनोहर दाणे यांनी मृत हरणाचा पंचनामा केला.
ममदापूरला विहिरीत पडून हरणाचा मृत्यू
By admin | Published: May 25, 2017 12:57 AM