येवला : पालखेड लाभ क्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकऱ्यांनी जलपूजन करून आनंदोत्सव साजरा केला. पालखेड कालवा व धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी आहे. धरणात जलसाठा कमी असल्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाºयांनी वितरिका ४६ ते ५२ला पाणी देण्याची असमर्थता दर्शविली होती.या पाण्याकरिता अनेकांनी अनेकवेळा निवेदने देऊन मागणी केली होती. एका शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेऊन पाणी देण्यासाठी साकडे घातले. पाणी मिळाले नाही तर पिकांचे नुकसान तर होईलच मात्र जनावरे व पिण्याच्या पाण्याचीमोठी समस्या निर्माण होईल, असे सांगण्यात आले. महाजन यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाºयांना पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. अंदरसूल परिसरात पाण्याचे आगमन होताच शेतकºयांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपा नेते बाबा डमाळे यांच्या हस्ते अंदरसूल, पेटीपूल, मन्याडथडी, गवंडगाव, सुरेगाव येथे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, बाबा सोनवणे, कमळकर देशमुख, नारायण देशमुख, संजय ढोले, कचरू गवळी, अण्णासाहेब ढोले, जगदीश गायकवाड, रामूदादा भागवत, आप्पासाहेब भागवत, संजय भागवत, प्रकाश बजाज, बंटी एंडाईत, भगवान जाधव, रामनाथ घोडके, भारत देशमुख, शंकर गायकवाड, हरिभाऊ साळुंखे, संतोष सोनवणे, संदीप वडाळकर, रतन जाधव, राजू सोनवणे, सुनील सोनवणे, गोरख जाधव, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर जोंधळे, ताराचंद भागवत, नाना वडाळकर, कचरु भागवत, भाऊराव भागवत, बाळासाहेब भागवत, अविनाश भागवत, सुभाष भागवत, रवि भागवत, संदीप वडाळकर, त्र्यंबक गोरे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
अंदरसूल परिसरामध्ये पालखेड कालव्याचे जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:43 AM