नाशिक : अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या भारतीय हज समितीने हज यात्रा-२०२०ची अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. २३ डिसेंबरपर्यंत हजला जाणारे यात्रेकरू आपला अर्ज आॅनलाइन पद्धतीने करू शकतात, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.हज समितीकडून यापूर्वी काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात हजयात्रेचे आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत १७ डिसेंबर अशी होती; मात्र काही कारणास्तव यामध्ये बदल करत समितीने अर्ज स्वीकृतीची मुदत २३ तारखेपर्यंत वाढविली आहे. भारत-सौदी अरेबिया या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या समझोत्यानुसार भारताला येत्या हज-२०२० यात्रेचा कोटा दिला जाणार आहे. मिळालेला एकूण कोटा हज कमिटी व खासगी हज टूर आॅपरेटर यांना भारत सरकारच्या धोरणानुसार विभागून दिला जाणार आहे. हज यात्रेच पहिले विमान २५ जून २०२०पासून उड्डाण करेल. २६ जुलै २०२० रोजी अखेरचे विमान सौदीच्या जेद्दा विमानतळाच्या दिशेने उड्डाण घेणार आहे. हजयात्रेचा समारोप २ आगस्ट रोजी होणार असून, हजयात्रेकरूंचा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास ४ आॅगस्ट २०२० पासून सुरू होईल. ६ सप्टेंबर २०२०पर्यंत यात्रेकरूंचे अखेरचे विमान भारतात येणार असल्याचे हज समितीने पत्रकात म्हटले आहे.
हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 16:59 IST
हजयात्रेचा समारोप २ आगस्ट रोजी होणार असून, हजयात्रेकरूंचा भारताच्या दिशेने परतीचा प्रवास ४ आॅगस्ट २०२० पासून सुरू होईल.
हज यात्रा-२०२० : अर्ज भरण्याची मुदत २३ डिसेंबरपर्यंत
ठळक मुद्दे२ आगस्ट रोजी हजयात्रेचा समारोप ६ सप्टेंबर २०२०पर्यंत यात्रेकरूंचे अखेरचे विमान भारतात येणार अर्ज स्वीकृतीची मुदत २३ तारखेपर्यंत वाढविली आहे.