ओझर टाऊनशिप : कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. बुधवारी पहिल्या पाळीतील ओझर येथे राहणाऱ्या कामगारांना सुटल्यानंतर व दुसऱ्या पाळीसाठी कामावर येणाऱ्या कामगारांना पोलिसांनी रस्त्यातच अडविले होते. गुरुवारी फक्त ओझर टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते, तर इतर कामगारांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले होते.लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एचएएल कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी कामगारांनी केली होती. ती मागणी एचएएल व्यवस्थापन व अकामगार संघटनांच्या समन्वय समितीने मान्य केली. जुलै महिन्यात १४ दिवस रोज साडेतीन तास जादा काम करून दिवस भरून देण्याच्या अटीवर १५ ते २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान बंद काळातील दिवस जादाकाम करून भरून काढण्याचा निर्णयाबद्दल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.
एचएएल कारखाना राहणार उद्यापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 1:25 AM
कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
ठळक मुद्देकामगार संघटना - व्यवस्थापनाची चर्चा