ओझर टाऊनशिप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने ही यशाची परंपरा अबाधित राखली आहे.कोरोना काळात शाळेने वेळोवेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेत एस एस सी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर ऑनलाईन व काही प्रसंगी ऑफलाईन मार्गदर्शन व सराव यात सातत्य ठेवल्यामुळेच दहावीला असणारे सर्वच्या सर्व २४३ विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण झाले असुन या विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा विजय मोरे (९७.६०) प्रथम क्रमांकाने, विशाल मनोज दाभाडे (९५.४०) द्वितीय आणि शंतनू सुनील वडघुले हा (९५.००) तृतीय क्रमांकाने यशस्वी झाला आहे.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि डायरेक्टर जनरल डॉ. मो. स. गोसावी, एच. आर. डायरेक्टर डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव प्रिं. डॉ. राम कुलकर्णी, ओझर विभागाचे अधीक्षक प्रिं. डॉ. एस. आर.खंडेलवाल, विद्यालयाचे प्राचार्य के. एन. पाटील सर, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
एच ए एल हायस्कूलची यशाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 7:45 PM
ओझर टाऊनशिप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने ही यशाची परंपरा अबाधित राखली आहे.
ठळक मुद्देदहावीला असणारे सर्वच्या सर्व २४३ विद्यार्थी उत्तम गुणांसह उत्तीर्ण