ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कारखान्यातील १८ ते ४४ वयोगटातील कामगार व अधिकाऱ्यांसाठी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली नसल्याने कामगारामध्ये नाराजी पसरली आहे. लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे.केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दि. १ मेपासून १८ ते ४४ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण होणार असून त्याची अंमलबजावणी ठिकठिकाणी सुरू झाली आहे. परंतु संरक्षण विभागाचा कणा असलेल्या ४५ वर्षापुढील एचएएल कामगारासाठी लसीकरण करण्यात आले असून त्यांचा दुसरा डोसही सुरू करण्यात आला आहे. मात्र १८ ते ४४ वयोगटातील कामगारासाठी एचएएल रुग्णालयात अद्यापही लस उपलब्ध झालेली नाही.आजही कारखान्यातील ४५ वर्षाखालील कामगारांची संख्या जास्त आहे. काही कामगार गेल्या महिन्यापासून स्वतःचे लसीकरण करून घेण्यासाठी नाशिकरोड, मोहाडी व शहरातील इतर ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेत आहेत. परंतु ते करताना तेथे कामगार बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, काही कामगार बांधव पहिला डोस मिळविण्यात यशस्वी झाले. आता तरी उरलेल्या सर्व कामगार बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकारे समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून सर्व कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सरसकट लसीकरण लवकर करावे, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे.वास्तविक पाहता एचएएलसारख्या मोठ्या प्रकल्पातील कामगारांसाठी शासनाने वेळेत लस उपलब्ध करून दिली पाहिजे. व्यवस्थापन व कामगार संघटना यांनीसुद्धा पाठपुरावा करून कामगारांसाठी लस उपलब्ध करणे गरजेचे असताना कामगार स्वत:च धावाधाव करून इतरत्र जाऊन लस घेत आहेत.
एचएएल रुग्णालयात अद्यापही लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 9:14 PM
ओझरटाऊनशिप : येथील एचएएल कारखान्यातील १८ ते ४४ वयोगटातील कामगार व अधिकाऱ्यांसाठी अद्यापपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली नसल्याने कामगारामध्ये नाराजी पसरली आहे. लवकर लसीकरण करावे, अशी मागणी कामगारांनी कामगार संघटनेकडे केली आहे.
ठळक मुद्देओझरटाऊनशिप : ४५ वर्षापुढील कामगारांचा दुसरा डोस सुरू