ओझर टाऊनशिप व कारखान्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. आतापर्यंत १७ एचएचएल कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. ही बाब व्यवस्थापन व कामगार संघटना यांनी विचारात घेऊन उच्च व्यवस्थापनाशी चर्चा करून दहा दिवसांच्या निर्बंध काळात कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी कामगारांतून होत आहे. प्रशासनाने बुधवार (दि.१२) निर्बंध आणखी कडक केले. मात्र कारखान्याने पहिल्या व दुसऱ्या पाळीतील कामगारांना बुधवारी कामावर बोलविले होते. दुसऱ्या पाळीतील कामगार कामावर येताना व पहिली पाळी सुटल्यानंतर कामगार घरी जात असताना पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडविले. कामगारांनी विनवण्या केल्यानंतर पोलीसांनी त्यांना घरी जाऊ दिले. कामगारांची गैरसोय होऊ नये यासाठी कारखाना पुढील नऊ दिवस बंद ठेवावा (अत्यावश्यक सेवा वगळता)अशी मागणी कामगारांनी संघटनेकडे केली आहे.
इन्फो
कामगारांची नाराजी
नाशिक शहरातून आलेल्या व ओझर गावातील कामगारांना पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या नेतृत्वाखाली ओझर येथील एअर फोर्स कॉर्नर येथे लावलेल्या कडेकोट नाकाबंदीत दुपारी ३ च्या शिप्ट साठी जाणाऱ्या कामगारांना व पहिली पाळी सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या कामगारांना अडविण्यात आल्याने मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे कामगारांनी एचएएल व्यवस्थापन व कामगार संघटना यांचेवर नाराजी व्यक्त केली.
कोट....
नाशिक शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही कामगारांना ड्युटीची सक्ती करण्यात येत आहे. कामगार संघटनेच्या कुचकामी नेतृत्वाचा फटका सामान्य कामगारांना भोगावा लागत आहे. कामगारांमध्ये सध्या भितीचे वातावरण पसरले आहे.
- संजय कुटे, माजी सरचिटणीस, एच.ए.एल. कामगार संघटना
फोटो - १२ एचएएल फॅक्टरी
===Photopath===
120521\12nsk_56_12052021_13.jpg
===Caption===
फोटो - १२ एचएएल