ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांच्या १ जानेवारी १९१७ पासून प्रलंबीत असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या आज तिसºया दिवशी ही एच ए एल नाशिक विभागातील ३५०० कामगारांनी सकाळी साडेसहा वाजेपासून एच ए एल प्रवेशद्वारावर एकत्र येऊन दिवसभर व्यवस्थापनाविरूद्ध घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. दरम्यान कामगारांच्या धाकाने अधिकारीवर्ग सकाळी लवकरच कामावर आल्याचे सांगण्यात येते.एच ए एल कामगारांच्या वेतन कराराची मुदत डिसेंबर २०१६ अखेर संपली असुन १ जानेवारी २०१७ पासूनचा नवीन वेतन करार आद्याप पर्यंत म्हणजे गेल्या ३४ महिन्यापासुन प्रलंबित आहे. व्यवस्थापनाने १/१/२०१७ पासुनच्या कामगारांच्या प्रलंबीत वेतनकराराची बोलणी अखिल भारतीय एच ए एल कोआर्डीनेशन कमेटी बरोबर एक वर्ष उशिरा सुरु केली. आजच्या तारखेला जवळपास ११ औपचारिक आणि ४ अनौपचारिक बैठका झाल्या आहेत. या सर्व बैठकामध्ये व्यवस्थापनाने सन्मानजनक अशी कुठलीही आॅफर दिलेली नाही. या उलट वेल्फेअर संबंधीत अनेक सवलती सतत कमी करण्याचा सपाटाच लावला असुन सतत दुजाभावाचे आणि वेळकाढुपणाचे धोरण व्यवस्थापनाकडुन घेतले जात आहे. कामगार संघटनांनी वेळोवेळी, संयमाने, सनदशीर लोकशाही मार्गाने, अनेकदा अर्ज- विनंत्या आदि मार्ग अवलंबिले परंतू त्यास व्यवस्थापनाने कुठलीही दाद दिली नाही. रक्षामंत्री, खासदार,आमदार लोकप्रतिनिधींपर्यंत कामगारांनी पाठपुरावा केला आहे. तरीही उपयोग झाला नाही. आणि शेवटी, कुठलाही पर्यायच उरला नाही म्हणुन नियमाप्रमाणे १४ दिवस अगोदर संपाची नोटीस देण्यात आली. आणि दि. १४ आॅक्टोबर पासुन कामगारांनी संप पुकारला. आज संपाच्या तिसºया दिवशी परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही कामगार प्रवेशद्वारावर मोठया संख्येने जमा होण्यापुर्वीच अधिकारी वर्ग कामावर गेले. दरम्यान कामगार तिन ही प्रवेशद्वारावर सकाळी साडेपाच पासून उपस्थित राहून कोणीही कामगार कामावर जाणार नाही याची दक्षता घेत आहेत .व्यवस्थापनाने सिव्हिल विभागातील कंत्राटी कामगारांना कामावर येण्याचे फर्माण सोडले होते. परंतू संपकरी कामगारांनी त्या कंत्राटी कामगारांना विनंती करून कामावर जाण्यापासून थांबविले असल्याची चर्चा कामगारामध्ये होती.
एच ए एल कामगारांचा संप तिसऱ्या दिवशी जैसे थे स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 8:52 PM
ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांच्या १ जानेवारी १९१७ पासून प्रलंबीत असलेल्या वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या आज तिसºया दिवशी ही एच ए एल नाशिक विभागातील ३५०० कामगारांनी सकाळी साडेसहा वाजेपासून एच ए एल प्रवेशद्वारावर एकत्र येऊन दिवसभर व्यवस्थापनाविरूद्ध घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. दरम्यान कामगारांच्या धाकाने अधिकारीवर्ग सकाळी लवकरच कामावर आल्याचे सांगण्यात येते.
ठळक मुद्देकामगारांच्या धाकाने अधिकारीवर्ग सकाळी लवकरच कामावर आल्याचे सांगण्यात येते.