शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

निम्मे शहर सामसूम : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:39 PM

डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या. आंदोलकांनी मैदानावरून राजकीय नेत्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला.

ठळक मुद्दे नाशकात मराठा समाजाच्या आंदोलकांचा संयम सुटल्याचे चित्रशहरात शुकशुकाट; वर्दळ मंदावली

नाशिक : आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीदरम्यान घेण्यात आला होता. या निर्णयानुसार आंदोलनाला सकाळी दहा वाजता मैदानावर प्रारंभही झाला. मात्र या दरम्यान, अंतर्गत मतभेद आणि राजकीय नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे आंदोलकांमध्ये ठिणगी पडली. ठिय्या आंदोलन करणारे आंदोलक अचानकपणे आक्रमक झाले आणि आंदोलकांचा गट मैदानावरून शहरातील बाजारपेठेच्या दिशेने सरकला. यावेळी आंदोलकांनी मेहेर सिग्नल चौकात हुल्लडबाजी करत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडत ‘खाकी’स्टाईलने जमाव पांगविला. याचदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावरही दोन वाहानांच्या काचा आंदोलकांकडून फोडण्यात आल्या.

आंदोलकांनी मैदानावरून राजकीय नेत्यांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. दरम्यान, माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना यावेळी धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते तसेच राजकीय नेत्यांच्या दिशेने काही पादत्राणे भिरकाविण्यात आली. डोंगरे वसतिगृहयेथून मराठा आंदोलकांचा मोर्चा अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, रेडक्रॉस चौक, शालिमार, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, चांडक सर्कल येथून टिळकवाडी, शरणपूररोडमार्गे डोंगरे वसतिगृहाकडे आला. येथे पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी न जुमानता द्वारका चौकात रास्ता रोको करण्याचा हट्ट धरला आणि दुचाकींवरून द्वारकेच्या दिशेने प्रस्थान केले. एकूणच नाशकात मराठा समाजाच्या आंदोलकांचा संयम सुटल्याचे चित्र दिवसभर पहावयास मिळाले.

शहरात शुकशुकाट; वर्दळ मंदावलीमराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलक आक्रमक झाल्यामुळे शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, शालिमार, रविवारकारंजा, मेनरोड, शिवाजीरोड, भद्रकाली, जुने नाशिक या संपुर्ण भागात शुकशुकाट पसरला आहे. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त असून दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी गस्तीवर आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस