शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

शहरात दीड लाख  बालकांना डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:29 AM

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात  १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़

नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली़ या मोहिमेद्वारे शहरात  १ लाख ४१ हजार १९१ बालकांना, तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ४ लाख ४५ हजार १८४ असे एकूण ५ लाख ८६ हजार ३७५ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़  महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक केंद्रात लहान बालकाला पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला़ जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून शुभारंभ करण्यात आला़  शहरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी महापालिका क्षेत्रात ६९३ बुथसह फिरते पथक अशी यंत्रणा उभारण्यात आली. ० ते ५ वर्षे वयोगटातील अपेक्षित १ लाख ८६ हजार ८३८ बालकांपैकी १ लाख ४१ हजार १९१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ पोलिओ डोसची शहरातील बालकांची संख्या शहरी आरोग्य सेवा केंद्र सातपूर-४,०५३, संजीवनगर-५,१५२,आरसीएच केंद्र गंगापूर-७,७२२, एमएचबी कॉलनी-५,१७७,सिडको - ४,७१९, अंबड-४,८२५, मोरवाडी-४,६६१, कामटवाडे-४,६३८,पवननगर-४,९१५, पिंपळगाव खांब-४,५७९, नाशिकरोड-५,३७३,विहितगाव-३,६६७, सिन्नर फाटा-४,७३७, गोरेवाडी-३,१०७,दसकपंचक-४,५५५, उपनगर-४,७४९, संगमा-४,६४६,बजरंगवाडी -४,५५४,भारतनगर-४,६८७, वडाळागाव-४,३६५, जिजामाता-३,९६७,मुलतानपुरा-४,६४७, शासकीय रुग्णालय-६,५६९, रामवाडी- ३,१०८,रेडक्रॉस-३,६०४, मायको पंचवटी-४,७५६, म्हसरूळ- ५,६०८,मखमलाबाद-५,४६९, तपोवन-४,२०७, हिरावाडी-४,३७५एकूण १ लाख ४१ हजार १९१ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मोहिमेसाठी ३,६८३ बुथ लावण्यात आले होते़ यासाठी ९,३६३ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती़ ग्रामीण व शहरी भागात ही मोहीम आणखी चार दिवस म्हणजेच २ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओचे डोस पाजले जाणार आहेत़ या मोहिमेसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, विभागीय अधिकारी, खासगी सहा़ परिचारिका, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, अंगणवाडीसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले़ जिल्ह्यातील तालुकानिहाय  पोलिओ डोसची संख्यानाशिक-२३,४०७, बागलाण-३७,८९६, चांदवड-२७,१०७, देवळा -१५,३९७, दिंडोरी-३४,९७५, इगतपुरी-२५,३५६, कळवण-२१,३३७, मालेगाव-४०,२९९, नांदगाव-१९,९८९, निफाड-५३,६५२, पेठ-१२,९४६, सिन्नर-२७,६८६, सुरगाणा- १८,४७७, त्र्यंबकेश्वर-१७,४१४, येवला-२१,४३६ असे एकूण ४ लाख ४५ हजार १८४ बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका