नाशिक : ‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचे नमूद केल्याचे आढळून आल्याने नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.अन्न व औषध प्रशासनाने पंचवटीमधील सुपर स्टॉकिस्ट मे. जे.के. अॅण्ड सन्स, रविवार कारंजावरील मे. प्रफुल्ल ट्रेडर्स या घाऊक व्यावसायिकांकडून प्रत्येकी अनुक्रमे १ लाख ३६ हजार २१० रुपये तर १ लाख ३ हजार ७० रुपये असा एकूण २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा साठा जप्त केला आहे.साखरेऐवजी कृत्रिम गोडी आणणारे खाद्यपदार्थ वापरण्यात नागरिकांचा कल आहे. त्यामुळे अशा खाद्यपदार्थांमध्ये ‘शुगर फ्री टेबल टॉप स्विटनर’ हा एक प्रसिद्ध व नामांकित ब्रॅँड आहे. या ब्रँडनेही १०० टक्के सुरक्षित अशी जाहिरात करून विक्र ीवर भर दिला. मात्र त्यांच्या खाद्यपदार्थाच्या वेष्टणावर उत्पादनात अॅसपारटेम नावाचा घटक असल्याने लहान मुलांसाठी व फेनाईल केटोनोरीया या आजाराच्या रु ग्णांसाठी उत्पादन योग्य नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. सहायक आयुक्त सी. डी. राठोड, व सहआयुक्त सी. डी. साळुंके यांच्या आदेशान्वये ही कारवाई झाली.अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, संदीप देवरे यांनी रविवार कारंजा, पंचवटी परिसरातील दोन घाऊक व्यापाऱ्यांकडून या उत्पादनाचा मोठा साठा जप्त केला आहे. या उत्पादनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील तपास बाविस्कर व देवरे हे करीत आहेत.
‘शुगर फ्री’ उत्पादनाचा अडीच लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 1:39 AM
‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचे नमूद केल्याचे आढळून आल्याने नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रुपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.
ठळक मुद्देएफडीएची कारवाई : नमुने तपासणीसाठी रवाना