तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी युरिया खतासाठी इतर खते घेण्याची सक्ती केली जात होती. तर युरिया खताची लिंकिंग होत असल्याचाही आरोप होत होता. या प्रश्नावर प्रहार संघटनेने संबंधितांना निवेदन दिले होते, मात्र दखल घेतले न गेल्याने प्रहारने अर्धनग्न ठिय्या आंदोलन बुधवारी, (दि.२८) सकाळी ११ वाजता येवला प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केले होते.
तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत वास्ते यांनी, आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन युरिया प्रश्नी दोन दिवसात बफर स्टॉक रिलीज करण्याचे तसेच युरियाबरोबर इतर खत घेण्याची सक्ती केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सायंकाळी साडेपाच वाजता सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.
प्रहारच्या या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना व भ्रष्टाचार निर्मूलन समितीने जाहीर पाठिंबा दिला होता. आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, अमोल फरताळे, वसंत झांबरे, किरण चर्मळ, रामभाऊ नाईकवाडे, जगदीश गायकवाड, सचिन पवार, बाळासाहेब बोराडे, गणेश लोहकरे, संतोष जाधव, राहुल बाराहाते, चेतन बोरणारे, अमोल नाईकवाडे, समाधान शेटे, गणेश बोराडे, सुनील जाधव, शाम मेंगाणे, शुभम बोरणारे, संदीप कोकाटे, नारायण घोटेकर, भागवत भड, धनंजय खरोटे, श्रावण ठोंबरे, शंकर गायके, बापूसाहेब शेलार, सुनील पाचपुते, विपुल कानडे, गोविंद पवार, विष्णुपंत पवार, सतीश ठाकरे, पांडुरंग शेलार, दत्तात्रेय बोरणारे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
फोटो- २८ येवला आंदोलन
280721\28nsk_33_28072021_13.jpg
फोटो- २८ येवला आंदोलन