नाशिक : जिल्ह्यातील बळींच्या संख्येने चार हजारांचा आकडा ओलांडला असून, त्यातील सुमारे निम्मे म्हणजेच १९०६ बळी हे केवळ नाशिक महापालिकेसह नाशिक तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल तालुक्यांतील सर्वाधिक बळींमध्ये निफाड तालुक्याची संख्या असून, तिथे ३६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या प्रारंभीच्या टप्प्यात नाशिक मनपाच्या तुलनेत मालेगाव मनपाच्या क्षेत्रात बाधितांचे प्रमाण अधिक होते. तसेच जिल्ह्यातील पहिला बळीदेखील मालेगावमध्येच गेला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात मालेगावातील रुग्णवाढ मागे पडून नाशिक शहरात सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यू वाढले होते. पहिल्या लाटेतदेखील सर्वाधिक बळी हे नाशिक मनपा क्षेत्रातीलच होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चपासून नाशिक मनपा क्षेत्रापेक्षाही नाशिक ग्रामीण क्षेत्रातील बळींची संख्या सातत्याने अधिक राहिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे सर्वांत कमी म्हणजे ८६२ इतकी रुग्णसंख्या पेठ तालुक्यात आणि सर्वांत कमी २२ मृत्यू हे नजीकच्या सुरगाणा तालुक्यातील आहेत.
इन्फो
दहा तालुक्यांत शंभरहून अधिक मृत्यू
जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांमध्ये शंभरहून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यातदेखील तालुकानिहाय वर्गीकरण केल्यास निफाड तालुक्यात सर्वाधिक ३६७, तर त्याखालोखाल मालेगाव मनपा क्षेत्रात २७९. सिन्नरला २०७ नागरिकांचा, तर नाशिक तालुक्यात १८९ मृत्यू झाले आहेत. शंभरहून अधिक बळी असलेल्या अन्य पाच तालुक्यांमध्ये येवला १४७, बागलाण १४१, मालेगाव १४१, चांदवडला १३८, दिंडोरीत १३७ यांचा समावेश आहे, तर अन्य बळींमध्ये इगतपुरी ९३, देवळा ७१, कळवण ५५, त्र्यंबक ४६, पेठ २६, सुरगाणा २२ बळींची नोंद झाली आहे.
इन्फो सध्या
ग्रामीणपैकी सर्वाधिक रुग्ण नाशिक तालुक्यात
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या नाशिक तालुक्यात १६५८ इतकी आहे. त्याखालोखाल १०६१ इतकी लोकसंख्या सिन्नर तालुक्यात, तर त्यानंतर १०४२ रुग्णसंख्या निफाड तालुक्यात आहे. जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णसंख्या २० हजार ६९३ असून, त्यात नाशिक मनपा क्षेत्रातच निम्म्याहून अधिक म्हणजे १० हजार ७३३ रुग्ण आहेत. तर मालेगाव मनपा क्षेत्रात १३३८ उपचारार्थी रुग्ण आहेत.
------------------
ग्राफ स्टोरीसाठी
नाशिक मनपा-बळी १७०९
निफाड तालुका-बळी ३६७
मालेगाव मनपा-बळी २७९
सिन्नर तालुका-बळी २०७
नाशिक तालुका-बळी १८९