शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

नाशकात दहीपूलावरील तीनमजली अनधिकृत इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 7:17 PM

पालिकेची कारवाई : नोटीस बजावूनही बांधकामाचा प्रकार

ठळक मुद्देस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच महापालिकेने आता पक्क्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळविल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले

नाशिक - महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस बजावूनही सर्रासपणे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दहीपुलावरील तीन मजली इमारतीवर अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.१४) हातोडा चालविला. सदर इमारतीत नऊ भाडेकरू भरण्यात आले होते. रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याबरोबरच महापालिकेने आता पक्क्या बांधकामांकडे आपला मोर्चा वळविल्याने अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.१४) सकाळी नेहरूचौक, दहीपूल याठिकाणी फौजफाट्यासह धडक मारली. कानडे मारुती लेनसमोर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या तीन मजली इमारतीतील बांधकाम हटविण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी, त्याठिकाणी व्यवसाय करणाºया भाडेकरुंनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु, महापालिकेच्या पथकाने त्यांना वास्तव समजून सांगत दुकानांमधील माल काढून घेण्यासाठी तासाभराची सवलत दिली. पथकाकडून कारवाई अटळ असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यावसायिकांची धावपळ उडाली. या इमारतीत वैष्णवी एनएक्स, मुद्रा फॅशन,निधी फॅशन, गणेश काजे सेंटर, रिअल स्टिच सेंटर आदी दुकाने थाटण्यात आलेली होती. संबंधित व्यावसायिकांनी दुकानातील माल, जमेल तेवढे फर्निचर हटविल्यानंतर पथकाने जेसीबी चालविला तसेच तिनही मजल्यांचे स्लॅब तोडून टाकण्यात आले. दिवसभर सदर मोहीम सुरू होती. अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना बघ्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या मोहीमेत पूर्वच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांचेसह मनपाचे २० कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका