शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

ॲल्युमिनियमचे २१ पाईप लांबविणाऱ्यांना ठोकल्या बेड्या; कारखान्यांमधील चोरीचे गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:55 PM

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

ठळक मुद्देपंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त १५ हजार २०० रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे पाइप हस्तगत

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमध्ये रात्रीच्या सुमारास शिरकाव करत ॲल्युमिनियम, कॉपरसारख्या धातूच्या वस्तू लांबविणाऱ्या तिघा चोरट्यांच्या सातपूर गुन्हे शोध पथकाने मुसक्या बांधल्या आहेत. त्यांच्याकडून कारखान्यांमधील चोरीचे वेगवेगळे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.१६) सातपूर येथील राजेंद्र इंडस्ट्रीज नावाच्या कारखान्यातून ३० हजारांचे ॲल्युमिनियमचे पाइप लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी गुन्हे शोध पथकाला दिला. यानंतर पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत त्यामधील संशयितांच्या वर्णनावरून तपासाला गती दिली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता योगेश विजय मराळ (२६, रा. धर्माजी कॉलनी, सातपूर), अशोक बाहू जाधव (३३) आणि रवींद्र ऊर्फ राऊडी अशोक धोत्रे (१९, दोघे रा. प्रबुद्धनगर, सातपूर) अशी त्यांनी स्वत:ची नावे सांगितली. त्यांची कसून चौकशी करत पोलिसांना त्यांनी पाइप चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून १५ हजार २०० रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे पाइप हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांनी यासह अन्य कारखान्यांमध्येही यापूर्वी चोरी केल्याची कबुली दिली असून याबाबत अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सातपूर पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटकMIDCएमआयडीसीtheftचोरी