नाशिक : व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून एका महिलेसोबत अश्लील चॅटींग करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शंशयिताच्या मोबाईलचा माग काढत औरंगाबादच्या फुलंब्री येथे त्याला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नाशिक शहरात कामाला असलेल्या पिडित महिलेला डिसेंबर २०१९ मध्ये राशी भविष्य या व्हॉटसअप ग्रुप वर कोणीतरी ॲड केले. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या शेअर केल्या. त्यातील एका मोबाईल क्रमांकाने त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यानी फिर्यादी यांना त्यांचे व्हॉटसअप प्रोफाईलद्वारे चॅटींग सुरू केल्या. त्याने त्यांचे नाव अमोल जाधव असे सांगुन तो डॉक्टर असल्याची बतावणी करीत त्याचा फुलंब्री, औरंगाबाद या ठिकाणी दवाखाना असल्याचे सांगत पिडितेला समस्या सोडविण्यासाठी औरंगाबादला येण्यास सांगीतले. मात्र त्याचे वागणे अक्षेपार्ह वाटल्याने पिडितेने त्याला ब्लॉक केले. त्यानंतरही त्याने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून पिडितेला संपर्क साधला. त्यांच्याशी २९ फेबुर्वारी २०२० रोजी अश्लिल चॅटींग करून फिर्यादी यांना स्वत:चे अश्लिल फोटो पाठवन फुलंब्री येथून दवाखाना बंद करून पळ काढला. शोध घेऊनही तो मिळत नसल्याने पोलीस निरीक्षक देवराज बोरसे,पोलीस शिपाई मंगेश्वर काकुळदे, राउत यांनी आरोपीने वापरलेल्या मोबाईलच्या आधारे बुधवारी (दि.५) फुलंब्री येथे जावुन डॉ.अमोल किसन जाधव, वय(२८, रा.वावना, तालुका फुलंब्री, औरंगाबाद) याला अटक केली. दरम्यान, न्यालायालाने जाधवची एक दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली असून त्याने आणखी काही महीलांच्या बाबत या प्रकारचा गुन्हा केला आहे का याचा पोलीसशोध घेत आहेत.