गेल्या अनेक महिन्यांपासून सिन्नर शहर व तालुका परिसरात मोटारसायकल चोऱ्यांचे व सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. दि. १० जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आडवा फाटा सिन्नर येथून एक होंडा शाईन मोटारसायकल ही चोरट्याने चोरून नेल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचे मोटारसायकलवरून निफाड शहरातून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून चोरून नेल्याचा प्रकार घडलेला होता. त्यावरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटनेची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यात तसेच नजीकच्या जिल्ह्यात तपास पथके रवाना केली होती. सिन्नर पोलीस ठाण्याकडील पोलीस पथकाने आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यात संशयित आरोपीतांची नावे निष्पन्न केली. यातील संशयित हा बुधवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास सिन्नर आडवा फाटा येथे येणार असल्याबाबत गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून त्यास रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता सिन्नर येथून मोटारसायकल चोरी करून त्याने त्याचे दुसरे साथीदाराचे मदतीने निफाड शहरात सोनसाखळी चोरी केली असल्याबाबत कबुली दिल्याने त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेस निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते.
इन्फो
मोटारसायकलींचा वापर चोरीसाठीच
चौकशीत त्याने व त्याच्या साथीदाराने सिन्नर शहरातील आडवा फाटा व बसस्थानक परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्यांचा वापर करून सिन्नर, निफाड, शिर्डी, संगमनेर या शहरात सोनसाखळीचे गुन्हे केले व त्या मोटारसायकली शिर्डी बसस्थानक परिसरात बेवारस स्थितीत सोडून दिल्याची कबुली दिलेली आहे. या संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याचा दुसऱ्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौकट-
..यांनी रचला सापळा
दुचाकी आणि सोनसाखळी चोराचा छडा लावण्यासाठी सिन्नर पोलिसांच्या पथकाने कंबर कसली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सपोनि विजय माळी, सहा.पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार भगवान शिंदे, विनायक आहेर, विनोद टिळे, समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे यांच्या पथकाने मोटारसायकल व सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या संशयितास सापळा रचून अटक केली. यातून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत.
फोटो - १५ सिन्नर क्राइम
सिन्नर व अनेक तालुक्यात दुचाकी चोरून त्यावर सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितास सिन्नर पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपीसह जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, विजय माळी यांच्यासह सिन्नर पोलिसांचे पथक.
150721\15nsk_40_15072021_13.jpg
फोटो - १५ सिन्नर क्राइम सिन्नर व अनेक तालुक्यात दुचाकी चोरून त्यावर सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयितास सिन्नर पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपीसह जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, विजय माळी यांच्यासह सिन्नर पोलिसांचे पथक.