ओझरटाऊनशिप : ओझर येथे चांदणी चौक, राजवाडा परिसरात हातात हत्यार घेवुन आरडाओरडा करून रहिवाशामध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघा गुंडाना ओझर पोलीस गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.भव उर्फ दादाराव त्रिभुवन व आदेश उर्फ गोट्या निकम (दोघे ही राहणार मिलींद नगर, ओझर) असे संशयितांची नावे आहेत. हे दोघे संशयित ओझर परिसरातील चांदनी चौक, मल्हार चौक व कोळवाडा परिसरात हातात धारदार शस्र घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव यांना मिळाली.
त्यांनी ही माहिती त्वरीत पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांना कळवली. त्यानंतर ओझर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक युवराज अहिरे, सहाय्यक पोलीस पोलिस उपनिरीक्षक बी. आर. बैरागी, हवालदार बापू आहेर, पोलिस नाईक धारबळे, पोलिस नाईक चौगुले, अहिरराव, पोलिस शिपाई अनुपम जाधव, पोलिस शिपाई अमोल सूर्यवंशी, पोलिस शिपाई हेगडे यांनी सापळा रचून रविवारी (दि.७) रात्री शिताफीने अटक केली.
पोलीस शिपाई अनुपम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे करीत आहेत.