जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील अंगणवाडी मधील कुपोषित बालकांना ग्रामपंचायत नायगव्हाण यांच्या वतीने ‘एक मुठ पोषणाची’ या संकल्पनेतुन बालकांना डाळ, तेल, गुळ, बटाटा, मठ, अंडी या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय व्यवहारे, सरपंच हिराबाई ढोणे, उपसरपंच श्रावण कांदळकर, सदस्य प्रशांत पानपाटील, हिराबाई बाराहाते, मंगलाबाई शिंदे तसेच बाबासाहेब मांजरे, भाऊसाहेब ढोणे अंगणवाडी सेविका अश्विनी पुराणिक, श्रीमती बागल, मदतनीस अनिता पानपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.(फोटो २८ नायगव्हाण १)येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे एक मूठ पोषणाची उपक्र मांतर्गत वाटप करतांना सरपंच हिराबाई ढोणे, श्रावण कांदळकर, प्रशांत पानपाटील, संजय व्यवहारे.
नायगव्हाण येथे एक मुठ पोषणाची उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 3:10 PM
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील अंगणवाडी मधील कुपोषित बालकांना ग्रामपंचायत नायगव्हाण यांच्या वतीने ‘एक मुठ पोषणाची’ या संकल्पनेतुन बालकांना डाळ, तेल, गुळ, बटाटा, मठ, अंडी या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्दे मान्यवर उपस्थित होते.