नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक एअरपोर्ट व कुडोस कोअर लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या हस्तकला व चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पाच गटांत घेण्यात आलेल्या हस्तकला व चित्रकला स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पिला फार्माचे राजेंद्र सानप, पंकज मोहिते यांनी विद्यार्थ्यांना ड्रॉर्इंगशिट, इतर साहित्य उपलब्ध करून दिले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता जगळे, आराधना जाजू व श्रद्धा कासट यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना नगरसेवक संगीता गायकवाड व रवि पगारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद जाधव, सचिव सुनील तुलसानी, खजिनदार रितेश पटेल, माजी अध्यक्ष गौरांग ओझा यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालकांना आरोग्याबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत डॉ. नितीन सुराणा यांनी मार्गदर्शन केले, तर रोटरीच्या उपक्रमासंदर्भात अभिजित जोपूळकर यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन शीतल राठी यांनी केले. यावेळी अरिमा केला, रोटरी सदस्य डॉ. ममता सुराणा, वैशाली जाधव, योगीता ठाकरे, हेमल ओझा, स्मिता गणोरे, दीप्ती निकेन, दीपिका जोपूळकर, ज्योती येवले, अनंत ठाकरे, प्रितेश शाह, नितीन सुराणा, किरण विसपुते, धिरज दळवी, विपुल शाह आदी उपस्थित होते.
हस्तकला-चित्रकला स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:39 PM