लोहोणेर : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील ग्रामीण हस्तकलामधील पूर्वापार चालत आलेला फडकी छपाई व्यवसाय आता लोप पावत चालला आहे. ही कला पुढील काळात देखील जिवंत रहावी,यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी येथील हस्त कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
फडकी छपाई व्यवसाय ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी येथील रंगारी समाजबांधवांशी समस्या जाणून घेत फडकी कशाप्रकारे तयार केली जाते, यात वापरला जाणारा कच्चा माल कुठून उपलब्ध होतो. विक्रीव्यवस्थेत येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती देवरे, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी, विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी, बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एस. भामरे, एम. ए. जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव उपस्थित होते.
यावेळी स्वयंभू श्रीसिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन ट्रस्टने केलेल्या विकासकामांची पहाणी करत भविष्यात करावयाच्या विकासकामाबाबत माहिती घेतली. गावातील हस्त व्यवसायातून कापडी फडकी तयार करणाऱ्या कुटुंबातील कारागीर व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करत असून, व्यवसायात कष्ट अधिक असून, मिळणारा नफा हा खूपच कमी प्रमाणात असल्याने हा व्यवसाय नवीन पिढी करण्यास तयार होत नाही. तसेच नवनवीन डिझाईन व रंगाचे कापड बाजारात उपलब्ध होत असल्याने या मालाला असलेली मागणी खूपच कमी प्रमाणात होत आहे. हस्तकला व्यवसाय भविष्यातदेखील टिकून रहावा, यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून हस्तकलाकारांना प्रशिक्षण, नवीन सुधारणा करून मदत करण्याचे आपले प्रयत्न असून, जिल्ह्यातील हस्तकलाकारांना एकत्र आणून अनेक चांगली उत्पादने तयार करून तसेच त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यासाठी काम करण्यात येईल, असे लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
तसेच गणेशनगर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन येथील गरोदर मातांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले
यावेळी वसंत शिंदे, प्रदीप शेवाळे, भरत धनवटे, दिलीप अहिरे, किशोर कोठावदे, हेमंत जगताप, नीलेश भावसार, आरोग्य सेवक रामचंद्र हिरे, ग्रामविकास अधिकारी संजय वाघ उपस्थित होते.
-------------------
फडकी ही ग्रामीण भागातील आदिवासी समाजात फडकी वस्त्राला महिलांमध्ये अतिशय मानाचे स्थान असून, आदिवासी महिला आजही परंपरागत चालीरीती जोपासत फडकीचा वापर शालसारखा अंगावर पांघरूण म्हणून करतात, लग्न समारंभावेळी कापड खरेदीवेळी पहिले शुभ वस्त्र म्हणून फडकीची पूजा करत इतर वस्त्र खरेदी केले जाते. परंतु, बस्ता पद्धत जवळपास नवीन पिढीत बंद झाल्याने फडकीची मागणी कमी झाली असल्याचे फडकी तयार करणारे कारागीर शांताराम भावसार यांनी सांगितले.
----------
फडकी बनवण्यासाठी कच्चा माल महाग झाला असून, छपाई करण्यासाठी कारागीर मजुरी कमी असल्याने नवीन पिढी तयार होत नाही. मिळणारा नफा खूपच कमी असल्याने आधुनिकतेमुळे मागणी कमी झाली.
- शांताराम भावसार, फडकी हस्तकला कारागीर, ठेंगोडा
-------------
ठेंगोडा येथे हस्तकला फडकी तयार करणाऱ्या व्यवसायाच्या भेटीप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मीना मोरे, ज्योती देवरे, कारागीर व अधिकारी. (१६ लोहोणेर)
===Photopath===
161220\16nsk_4_16122020_13.jpg
===Caption===
(१६ लोहोणेर)