नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत शेतकºयांना कीटकनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केले असून, रासायनिक खते, कीटकनाशके व औषध विक्रेत्यांनी शेतकºयांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.शेतातील वेगवेगळ्या पिकात फवारणी करताना कीटकनाशक नाक, त्वचा, तोंडाद्वारे शरीरात गेल्याने विषबाधा होत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्णातही काहीवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी करताना शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा. शिफारस नसताना दोन व दोन पेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करण्यात येऊ नये. कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतकºयांनी संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. शरीरावर जखमा किंवा आजारी असल्यास फवारणी करणे टाळावे.अपघाताने विषबाधेची दुर्घटना घडल्यास तत्काळ प्रथमोचार करावेत व विनाविलंब बाधित रु ग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे अशा सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.दरम्यान, राज्यातील सर्व कीटकनाशके विके्र त्यांनी कीटकनाशकांची विक्र ी करताना संरक्षित किट उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. तसेच अतिरिक्त संरक्षित किट विक्र ीसाठीही उपलब्ध ठेवण्यात यावेत, असे निर्देश कृषी संचालकांतर्फे करण्यात आले आहेत.मजुरांनाही संरक्षक किट द्याशेतकरी/शेतमालक मजुराकडून फवारणी करून घेतात. अशावेळी शेतकरी/ शेतमालकाने नैतिक जबाबदारी पाळून फवारणी करणाºया शेतमजुरास संपूर्ण शरीर झाकले जाईल असे सरंक्षण किट द्यावे व फवारणी समक्ष करून घेण्यात यावी. विषबाधेची लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे. तसेच अशा विषबाधेची माहिती तत्काळ ग्रामपंचायत, पोलीसपाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
कीटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:32 AM
नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत शेतकºयांना कीटकनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केले असून, रासायनिक खते, कीटकनाशके व औषध विक्रेत्यांनी शेतकºयांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देकृषी विभाग : औषध विक्रे त्यांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना