बोडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर उपाय म्हणून पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंड आणि सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच फोरमन सापळे लावल्याने बोंडअळी नियंत्रणात येणार आहे. ही खर्चिक बाब असल्यामुळे शेतकरी टाळाटाळ करतात, ही बाब प्रशांत काबरा या शेतकºयाने हेरली व पदरमोड करुन १५१ फोरमन सापळ्यांचे वाटप जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किरण विरकर, कृषी अधिकारी प्रशांत वास्ते, प्रदीप मुंदडा यांच्या हस्ते केले.तालुक्यात गेल्या वर्षी शेकडो एकरमधील कपाशीचे पीक गुलाबी बोंड अळीने नष्ट केले होते. बोंड अळी रोखण्यासाठी शेतकºयांनी बीटी कपाशीचा स्वीकार केला. सुरुवातीला त्याचा चांगला परिणाम दिसला. कापसाचे उत्पन्न देखील वाढले. मात्र बीटी बीजी टू बियाण्यांवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने यंदा परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून दुष्काळी, नापिकीमुळे त्रस्त शेतकºयांना यंदा कापसापासून उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे मात्र, मागील काही दिवसांपासून बीटी टू या नवीन कपाशी वाणावर गुलाबी बोंड अळीने आक्र मण केले आहे. या सापळ्यामुळे बोंडअळीचे प्रमाण घटून उत्पादन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.यावेळी जालिंदर आहेर,अनिल साठे, विठ्ठल गोरे, राहुल खोकले, हरिदास पवार, अशोक सोनवणे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.कोट...मागील वर्षी बोंड अळीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी हा फटका शेतकºयांना बसू नये यासाठी मोफत बोंड अळी नियंत्रण फोरमन ट्रॅप देत आहे.- प्रशांत काबरा, येवलामागील वर्षी दोनशे रु पयांचे फोरमन सापळे घेतले असते तर दोन लाखांचे दुष्काळ झाले नसते. या वर्षी त्याचे महत्त्व कळले म्हणून त्याचा वापर करीत आहे. इतर शेतकर्यांनीही त्यांच्या शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फोरमन सापळ्यांचा वापर करावा.- जालिंदर आहेर, शेतकरी, रहाडी
बोंडअळी नियंत्रणासाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 6:09 PM