शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

नाशिक महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 4:43 PM

पदे रिक्त : वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा, शासनाकडे मागणी

ठळक मुद्देआयुक्तांनी सुमारे १४ अधिका-यांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहेसन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत

नाशिक : महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे करत असले तरी, सद्यस्थितीत अनुभवी वरिष्ठ अधिका-यांची वानवा भासत आहे. पालिकेत महत्त्वाची खाती ही प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी सुमारे १४ अधिका-यांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहे. परंतु, शासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता महापालिकेला अधिकारी मिळणे अवघड मानले जात आहे.महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये ती संख्या १३३ इतकी होती. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिका-यांसह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचा-यांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिका-यांनी राजीनामे दिले शिवाय, शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला. चार दिवसांपूर्वी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त झाले. सद्यस्थितीत, महापालिकेत उद्यान अधीक्षक, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपआयुक्त प्रशासन, शहर अभियंता आदी महत्त्वाची पदे प्रभारींच्या हाती आहेत. त्यात, मुख्य लेखापरीक्षकांकडे प्रशासनाचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांची तारांबळ उडताना दिसते, तर आरोग्य व वैद्यकीय या दोन महत्त्वाच्या खात्यांवर प्रभारी नेमणुका आहेत. कर विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांचाही कालावधी संपुष्टात आलेला आहे, तर नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांचा कालावधी जूनमध्ये संपुष्टात येईल. महापालिकेत कर्मचारीवर्ग पुरेसा आहे परंतु, अधिकारीवर्गाची वानवा आहे, हे वास्तव आयुक्तांनीही मान्य केले आहे. त्यानुसार, त्यांनी शासनाकडे अधिका-यांची मागणी केलेली आहे. परंतु, शासनाची एकूणच सावध भूमिका पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारीवर्ग महापालिकेला मिळण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका